You are currently viewing भगवद्गीता अध्याय अकरावा विश्वरूपदर्शन योग

भगवद्गीता अध्याय अकरावा विश्वरूपदर्शन योग

केवळ एका अंशाने प्रकट झालेल्या भगवंताच्या अनंत विभूती जाणून अर्जुन चकित झाला. भगवंतांनी आपल्या अविनाशी विराट स्वरूपाचे दर्शन द्यावे म्हणून अर्जुनाने प्रार्थना केली. अर्जुनास विराट रूप साध्या डोळ्यांनी दिसले नसते म्हणून भगवंतांनी अर्जुनास दिव्यदृष्टी दिली. तशीच दिव्यदृष्टी संजयास श्री व्यास महर्षींनी दिली. त्यामुळे विराट स्वरूपाचे दर्शन संजयाने धृतराष्ट्रास केले. विश्वरूप म्हणजेच विराट स्वरूप होय.

आकाशात सहस्त्रावधी सूर्यांचा उदय व्हावा तसे अत्यंत तेजस्वी असे आपल्या सर्व ऐश्वर्यासह विराट स्वरूप भगवंतांनी अर्जुनास दाखविले. अनेक डोळे व तोंडे, .अनेक बाहू, अनेक पोटे असलेल्या तसेच सर्व बाजूंनी अनंत रूपे असलेल्या मुखातून निघणाऱ्या अनंत ज्वाला, दाढेत अडकलेले कौरव सैन्य, तसेच गज, अश्व, रथी, महारथी हे विश्वमुखात जात होते. अर्जुनाने भगवंतांच्या देहामध्ये सर्व देव-देवता पाहिल्या. अनेक ऋषींचे, मुनींचे समुदाय, योगीजनांचे समुदाय, ब्रह्मदेव, शंकर, भगवंतांच्या देहात पहिले. चंद्र व सूर्य हे भगवंतांचे नेत्र आहेत. पेटलेल्या अग्नीसारखे हे मुख पाहून अर्जुन थरारला. चतुर्भुज होण्याची विनंती त्याने भगवंतांना केली. ती भगवंतांनी मान्य केली. हा सारा वृत्तांत या अध्यायात आला आहे.

अर्जुन उवाच
मदनुग्रहाय परमं गुहामध्यात्मसञ्जितम् ।
यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ।।११-१।।
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ।।११-२।।

अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला, त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले; कारण हे कमलदलनयना! मी आपल्याकडून भूतांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत. तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे.

एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमेश्वर ।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ।।११-३।।
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्।।११-४।।

हे परमेश्वरा! आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात, ते बरोबर तसेच आहे. हे पुरुषोत्तमा! आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेज यांनी युक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. हे प्रभो! जर मला आपले ते रूप पाहता येईल, असे आपल्याला वाटत असेल, तर हे योगेश्वरा! त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा.

श्री भगवानुवाच
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ।। ११-५।।
पश्यादित्यान्वसूनुद्रानश्विनौ मरुतस्तथा ।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ।।११-६॥

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था! आता तू माझी शेकडो-हजारो नाना प्रकारची, नाना रंगांची आणि नाना आकारांची अलौकिक रूपे पाहा. हे भारता! माझ्यामध्ये अदितीच्या बारा पुत्रांना, आठ वसूंना, अकरा रुद्रांना, दोन्ही अश्विनीकुमारांना आणि एकोणपन्नास मरुद्गणांना पाहा. तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पाहा.

इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।
मम देहे गुडाकेश यत्त्वान्यद्रष्टुमिच्छसि ।।११-७।।
न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्।।११-८।।

हे अर्जुना! आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरासह संपूर्ण जग पाहा. तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल, ते पाहा; परंतु मला तू या तुझ्या चर्मचक्षूंनी खात्रीने पाहू शकणार नाहीस म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. तिच्या साहाय्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पाहा.

संजय उवाच
ततो राजमहायोगेशरो हरिः ।
दर्शयामास पार्थाय पर रूपरम् ।।९१-९।।

संजय म्हणाला, हे महाराज! महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणाच्या श्री भगवंतांनी असे सांगून मग पार्थाला परम ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखविले.

अनेकवक्तनकातदर्शन अनेक
दिव्याभरणं दिव्याने कोयतायुधम् ।।११-१०।।
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाशर्वमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ।।१९-१९।।
दिवि सूर्यसहसस्य भवेयुगपदुस्थिता ।
यदि भाः सदृशी सा स्याद्धासस्तस्य महात्मनः ।।११-१२।।

अनेक तोंडे व डोळे असलेल्या अनेक आशर्यकारक दर्शन असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या, दिव्य माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या, तसेच दिव्य गंधाने विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त, अनंतस्वरूप, सर्व बाजूंना तोंडे असलेल्या विराटस्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले. आकाशात हजार सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल, तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशाइतका कदाचितच होईल म्हणजे होणार नाही. अर्जुनाने जे विश्वरूप पाहिले ते अलौकिक होते. आकाशात हजार सूर्यांचे जेवढे तेज असेल त्याहीपेक्षा जास्त तेज या विश्वरूपाचे होते. या विराट स्वरूपाला सर्व बाजूंनी तोंडे होती. असंख्य डोळे होते. त्याने दिव्य अलंकार, शस्त्रे, माळा, गंध व वस्त्रे परिधान केली होती.

तत्रैकार्थ जगत्कृतनं प्रविभक्तमनेकथा ।
अपश्यदेवदेवस्य शरीर पाण्डवस्तदा ।।११-१३।।
ततः स विस्मयाविष्टो हरोमा धनञ्जयः ।
प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत ।। ११-१४।।

अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारांत विभागलेले संपूर्ण जग देवाधिदेव भगवान श्रीकृष्णांच्या त्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले. त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभे राहिलेला धनंजय प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला,

अर्जुन उवाच
पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसंघान्।
ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मुषच सर्वानुरगांच दिव्यान्।।११-१५।।
अनेकबाहूदरवक्क्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादि पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप ।।११-१६।।

अर्जुन म्हणाला, हे देवा! मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवांना, शंकरांना, सर्व ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहत आहे. हे संपूर्ण विश्वाचे स्वामी! मी आपल्याला अनेक बाहू, पोटे, तोंडे आणि डोळे असलेले, तसेच सर्व बाजूंनी अनंत रूपे असलेले पाहत आहे. हे विश्वरूपा! मला आपला ना अंत दिसतो, ना मध्य दिसतो, ना आरंभ.

किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ता दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ।। ११-१७।।
त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ।।११-१८।।

मी आपल्याला मुकुट घातलेले, गदा व चक्र धारण केलेले, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असे, प्रज्वलित अग्नी व सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त, पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टींनी अमर्याद असे पाहत आहे. आपणच जाणण्याजोगे परब्रह्म परमात्मा आहात. आपणच या जगाचे परम आधार आहात. आपणच अनादी धर्माचे रक्षक आहात आणि आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात, असे मला वाटते.

अनादिमध्यान्तमनन्तवीर्य मनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् । पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ।।११-१९।।
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः । दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन।।११-२०॥

आपण आदी, मध्य आणि अंत नसलेले, अनंत सामर्थ्याने युक्त, अनंत बाहू असलेले, चंद्र व सूर्य हे ज्यांचे नेत्र आहेत, पेटलेल्या अग्नीसारखे ज्यांचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापविणारे, असे आहात, असे मला दिसते. हे महात्मन्! हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकल्या आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत.

अमी हि त्वां सुरसङ्घा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति ।
स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः ।।११-२१।।
रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्लोष्मपाश्च ।
गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ।।११-२२।।

तेच देवतांचे समुदाय आपल्यात शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचे व गुणांचे वर्णन करीत आहेत. तसेच महर्षी व सिद्ध यांचे समुदाय सर्वांचे कल्याण होवो, अशी मंगलाशा करून उत्तमोत्तम स्तोत्रे म्हणून आपली स्तुती करीत आहेत. अकरा रुद्र, बारा आदित्य तसेच आठ वसू, साध्यगण, विश्वेदेव, दोन अश्विनीकुमार, मरुद्गण आणि पितरांचे समुदाय, तसेच गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सिद्धांचे समुदाय सचकित होऊन आपल्याकडे पाहत आहेत.

रूपं महत्ते बहुवक्क्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम्।
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम् ।।११-२३।।
नभःस्पृशं दीप्तमनेकवर्ण व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ।।११-२४।।

हे महाबाहो! आपले अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या व पाय असलेले, अनेक पोटांचे आणि अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रूप , सर्व लोक पाहून व्याकूळ होत आहेत. तसेच मीही व्याकूळ होत आहे; कारण हे विष्णो, आकाशाला जाऊन भिडलेल्या, तेजस्वी, अनेक रंगांनी युक्त, पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतःकरण झालेल्या माझे धैर्य व शांती नाहीशी झाली आहेत.

देशकलानि च ते मुखानि दृश्वैव कालानलसन्निभानि ।
दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ।।११- २५।।

दाढांमुळे भयानक व प्रलयकाळच्या अमीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असून माझे सुखही हरपले आहे. हे देवाधिदेवा! हे जगन्निवासा, आपण प्रसन्न व्हा.

Leave a Reply