You are currently viewing समानार्थी शब्द

समानार्थी शब्द

आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे. एका शब्दसाठी अनेक शब्द आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो. समान अर्थाच्या शब्दांना समानार्थी शब्द म्हणतात. याठिकाणी आपण मराठी भाषेतील समानार्थी शब्द जाणून घेणार आहोत.

मराठी भाषेतील समानार्थी शब्द खालीलप्रमाणे

अनलनिखारा, अग्नी, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर, अंगार, कृशान, आगीन, आग्न,
अभिषेक अभिशेष, अभिषव. 
अभिनयहावभाव, अंगविक्षेप. 
अभ्यासव्यासंग, सराव, परिपाठ. 
अमितअगणित, अमर्याद, असंख्य
अपयशपराभव, दुर्लोकिक, अपमान. 
अरण्यकानन, वन, विपिन, रान, अटवी.
अर्जुनपार्थ, धनंजय, फाल्गुन, भारत, किरीट.
अश्वघोडा, हय, तुरग, तुरंग, तुरंगम, वारू, वाजी, अस्प 
अहिसर्प, साप, भुजंग, व्याळ, उरग, पन्नग, फणी.
अर्थअभिप्राय, भाव, तात्पर्य, हेतू, मतलब, आशय, उद्देश, भावार्थ, 
आईमाता, जननी, माय, जन्मदा, जन्मदात्री, आईस, आउस, आऊस,आवय, अंबा, माउली.
आठवणस्मृती, स्मरण. 
आनंदमोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष, आनंदन, उल्हास, उद्धव.
आवाहन विनंती, बोलाविणे.
आश्चर्यनवल, विस्मय, अचंबा, आचरय, आचीर, आचोज, आच्छरिय. 
आहारभोजन, जेवण, जेमन.
आरसादर्पण, मुकुर, आदर्श.
आळशीकुचर, सुस्त, निरुद्योगी, मंद, कामचुकार, ऐदी, उठवळ, उंठोळ, उंडगळ, आळसट. उठाळ,
आराससजावट
इच्छाआर्जू, आस, आकांक्षा, अपेक्षा, आशा, वासना, मनीषा, कांक्षा,कांक्षया, स्पृहा, लिप्सा. 
ईश्वरअलख, अलक्ष, आनंदघन, परमेश्वर, देव, ईश, प्रभू.
इंद्रदेवेंद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणि, वासव, सहस्राक्ष.
उतारूप्रवासी, यात्रेकरू, यात्रिक.
उत्कर्ष भरभराट, चलती, वाढ, समृद्धी, संपन्नता, उवाय, उवाव. 
उंटउष्टर, उष्ट्र.
ऊनलोकर, ऊर्ण, ऊर्णा.
ऋणदार देणेकरी, ऋणको, ऋणाईत, कर्जदार, ऋणिया.
एकीएकजती, एकमती, एकचार, एकोपा, एकता, एकजथा, एकत्व,
ऐक्य, एकमेळ, एकलाधी, एकवळा, एकवाक्यता. 
एकचित्तएकाग्र, एकतान, एकतानता, एकभाव.
ऋषीमुनी, साधू, तापस, तपस्वी.
अंबरआकाश, गगन, नभ, आभाळ, अवकाश, व्योम, अंतरिक्ष, तारांगण, अंतराळ, अंबुट, ख, वितान, वियत.
करारठराव, वाचन, कबुली, बोली, निश्चय.
करामत चमत्कार, अद्भुत गोष्टी, नवल, कर्तृत्व, कौशल्य.
कपाळ निढळ, भाल, ललाट, कपोल, अलिक.
कमळअंबुज, पंकज, नीरज, राजीव, पद्म, नलिनी, अब्ज, सरोज, अंभोरूह, अंभोज, कंज, अरविंद.
कर्कशकर्णकठोर, बोचणारे, तुसडा, किर्र, त्राटिका, भांडखोर, भांडण.
कर्तृत्वपराक्रम, कर्तुकी, कर्तुक, कर्तुप.
कसदम, जोर, सामर्थ्य.
कावळावायस, एकाक्ष, काक, काउळा.
कासवकमट, कमठ, कूर्म, कच्छप, कच्छ.
काळजीचिंता, फिकीर, आस्था, कळकळ.
कार्यक्षमकुशल, दक्ष, निपुण, हुषार, कर्तुमकर्ता.
काळोखअंधार, तिमिर, तम, अंधकार.
कोकीळ कोइल, कोयल, कोगूळ, कोकिल, पिक. 
कोताआखूड, अपुरा, लहान, कमी, क्षुद्र.
किरणकर, अंशू, रश्मी, मयूख.
क्रीडाक्रीडन, खेळ, मौज, विलास, लीला, मनोरंजन, विहार.
कुरूपबेढब, आकाररहित, अरूप, विरूप, विद्रूप. 
कौशल्यनैपुण्य, खुबी, चातुर्य, करामत, कसब, प्रावीण्य.
कृष्णदेवकीपुत्र, वासुदेव, विष्णूचा आठवा अवतार, कन्हैया, मुरलीधर,
मुरारी, कान्हा. 
कृपन चिक्कू, कंजूष, कोमटा, हिमटा, खंख, खंक.
खगपक्षी, विहंग, द्विज, अंडज, शकुन्त, विहंगम.
खचढीग, थर, रास.
खजिनाभांडार, तिजोरी, कोश, द्रव्यनिधी, भांडागार.
गरुडवैनतेय, खगेंद्र, द्विजराज, खगेश्वर, तार्क्ष्य.
गरज. जरुरी, आवश्यकता, निकड.
गणपतीगजानन, वक्रतुंड, हेरंब, धरणीधर, लक्षप्रद, निधी, लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता, गणेश, विनायक, चिंतामणी, एकदंत.
गर्दीदाटी, खच.
घरसदन, भवन, गृह, गेह, आलय, निवास, धाम, निकेतन, आगर,भुवन.
घास. ग्रास, कवळ.
चंद्र. इंदू, शशी, विधू, सोम, हिमांशू, सुधांशू, सुधाकर, निशानाथ,
रजनीनाथ, शशांक, नक्षत्रेश, शशधर, कलानिधी, शुभ्रांशू.
चांदणे. कौमुदी, ज्योत्स्ना, चंद्रिका.
जमीनभू. भूमी, भुई.
जरबदरारा, दहशत, वचक, धाक, दबदबा.
जलालतीक्ष्ण, तिखट, उग्र, तापट, कडक, जालीम, तीव्र, जहाल. 
झाडवृक्ष, तरू, पादप, गुल्म, द्रुम, अगम, शाखी, विटप.
डोकेशीर, मस्तक, मूर्धा, शीर्ष, माथा.
डोळा नयन, लोचन, नेत्र, अक्ष, चक्षू, आवाळू, अंबक.
डौलदिमाख, ऐट, वट..

अजून काही समानार्थी शब्द खालीलप्रमाणे

ढगजलद, अंबुद, पयोधर, पयोद, नीरद, अब्द, घन, अभ्र, मेघ.
तलवारखड्ग, समशेर.
तलावतटाक, तडाग, सारस, कासार, कांतार.
तारुण्ययौवन, जवानी, ज्वानी.
तृप्तीसमाधान, संतोष.
तोंडवदन, आनन, मुख, तुंड, वक्त्र
दश कोटीअर्बुद, अर्बुज, अर्व.
दरिद्रीनिर्धन, खंक, खंख, खणखणपाळ, खंकळपाळ.
देवसुर, ईश्वर, अमर, निर्जर, विबुध, त्रिदश
देहशरीर, तनू, तन, काया, वपू.
दैत्य राक्षस, दानव, असुर.
देऊळराऊळ, मंदिर, देवालय.
दिवसवार, वासर,दिन.
दूधदुग्ध, पय, क्षीर.
धनसंपत्ती, द्रव्य, संपदा, दौलत.
धनुष्य चाप, कोदंड, तिरकामठा, धनू,
धूर्तअरकाट, लबाड, लुच्चा, भांडखोर, कावेबाज, कसबाती.
नदीसरिता, तटिनी, जलवाहिनी, कल्या, तरंगिणी. 
नवरापती, वल्लभ, भ्रतार, धव, कांत, दादला, अंबुला, कवेश.
नोकरचाकर, सेवक, आर्थिक, उलिंग, दास.
पत्नीबायको, भार्या, अर्धांगी, कांता, दारा, जाया, सहधर्मचारिणी, अलावत, अस्तुरी, अस्तरी, अंतुरी, अंबुली.
पराक्रम शौर्य, प्रताप, विक्रम, बहादुरी, पौरुष.
पर्वतगिरी, अचल, नग, अद्री, शैल.
पानपल्लव, पर्ण, पत्र, दल.
पायपद, पाद, चरण.
पाणीजल, अंबू, पय, नीर, तोय, उदक, जीवन, सलील, वारी, अंभ. 
पार्वतीउमा, दुर्गा, गौरी, कन्याकुमारी, काली, भवानी.
पुढारीनेता, नायक, अग्रणी.
पुरुषनर, मनुष्य, मर्द.
पूजा अर्चा, उपासना, अर्चन, सेवा.
पृथ्वीधरणी, धरती, वसुंधरा, धरित्री, भू, भूमी, धरा, मही, क्षमा, वसुधा,उरवी, कुंभिनी, अवनी, विश्वंभरा, मेदिनी, क्षिती.
पोपट शुक, राघू, रावा.
प्रघातचाल, पद्धत, रीत.
प्रबंधव्यवस्था, तजवीज.
प्रवीणनिपुण, कुशल, हुशार, पटू. 
प्रसिद्धप्रख्यात, नामांकित, ख्यातनाम, विख्यात.
प्रासादप्रीती, लोभ, अनुराग, अनुरक्ती.
प्रेमप्रीती, लोभ, अनुराग, अनुरक्ती.
प्रसिद्धीअशकारा, कीर्ती, गाजावाजा, अस्करा, ख्याती, आख्या, आढ्यता,
औसाफ.
फुलपुष्प, सुमन, कुसुम, सुम, आरल.
बळ. शक्ती, जोर, सामर्थ्य, ताकद.
बागउपवन, बगीचा, वाटिका, उद्यान,
बाणशर, तीर, सायक, इषू.
बापपिता, वडील, तात, जनक, जन्मदाता, तीर्थरूप, अंबक.
बिकटकठीण, अवघड.
बेडूकभेक, मंडुक, दर्दुर.
ब्रह्मदेवब्रह्मा, चतुरानन, कमलासन, विरंची, विधी, प्रजापती, विधाता,कंज.
ब्राह्मणद्विज, विप्र
भरभराटउत्कर्ष, चलती, समृद्धी.
भाऊभ्राता, बंधू, सहोदर.

मराठी भाषेतील समान अर्थाचे शब्द

भांडणतंटा, कलह, झगडा.
भांडखोरकलभांड, कलभंड, कलागती, कलागत्या, कलाझंगडी, कलांट,
कळाम, कळिंकटा.
भुंगाभ्रमर, अली, मधुप, मिलिंद, मधुकर, भृंग.
महामहान, मोठा, थोर.
माणूसमानव, मनुष्य, मनुज
मासामीन, मत्स्य
मित्रस्नेही, सखा, दोस्त, सुहृद
मिश्रणअमेज, अमेद.
मुलगासुत, तनय, आत्मज, तनुज, पुत्र, नंदन.
मुलगीसुता, तनया, आत्मजा, तनुजा, कन्या, दुहिता, नंदिनी, पुत्री
रक्तरुधिर, असू, असूत, असूद, शोणित.
रस्तामार्ग, पथ, वाट. 
रागसंताप, रोष, त्वेष, क्रोध, अमर्ष, आवेश, क्षोभ.
राजाभूपती, भूप, नृप, नरेश, नरेंद्र, पृथ्वीपती, प्रजापती, राय, लोकपाल,भूपाल, भूमिपाल. 
रात्ररजनी, यामिनी, निशा, विभावरी, शर्वरी.
रागीटकोपिष्ट, संतापी, कोपी. 
लक्ष्मीश्री, रमा, कमला, इंदिरा, पद्मा, पद्मजा. 
लोखंड. आय, आयस.
वल्लरीवेल, लता, लतिका..
वस्त्रवसन, अंबर, पट, कपडे. 
वानरमर्कट, कपी,शाखामृग. 
वारापवन, अनिल, मरुत, समीर, वायू, वात, समीरण, व्यान, गंधवाह
विहारखेळणे, क्रीडा, सहल.
विष्णूश्रीपती, कमलापती, रमापती, रमेश, चक्रपाणि, अच्युत, केशव, लक्ष्मीपती, नारायण, माधव, गोविंद, मधुसूदन, त्रिविक्रम, वासुदेव,पुरुषोत्तम, अंबरीष, हृषिकेशी, पद्मनाभ, पीतांबर, माराणू 
वीजचपला, तडित, बिजली, विद्युत, सौदामिनी, विद्युल्लता.
वेदना. यातना, कळ, दुःख.
शत्रूअरी, रिपू, दुष्मन, वैरी.
शंकरमहेश, त्र्यंबक, रुद्र, भालचंद्र, चंद्रशेखर, पार्वतीश, महादेव, सदाशिव, कैलासनाथ, महेश्वर, नीलकंठ, शिव, सांब, आदिनाथ, आदिपुरुष, आशुतोष, अंबरीष, कपाली, कपाळी.
शेषअनंत, वासुकी..
शेतकरीकृषिक, कृषीवल.
सकलसमस्त, सर्व, अखिल, निखिल,
संशयकलप, अंदेशा, विकल्प, शंका, कलाफ, कश्मल, किंत, किंतु.
संघर्षकलह, झगडा, टक्कर.
समुद्रसागर, उदधी, सिंधू, अर्णव, अंबुधी, पयोधी, जलधी, वारिराशी,
रत्नाकर, अब्धी, अंभोधि, अंभोनिधी, अंबुनिधी
संसर्गसंपर्क, संबंध, सहवास.
संहारनाश, विध्वंस, उच्छेद.
सह्याद्रीसह्य पर्वत, सह्याचल, सह्यगिरी.
सीमामर्यादा, हद्द.
सिंहशार्दुल, केसरी, पंचानन, मृगेंद्र, मृगराज, वनराज. 
सुवासिनीसौभाग्यवती, अहिवा, अविधवा, ऐहेव.
सुरुवातआदि, आरंभ, प्रारंभ.
ज्ञातासूज्ञ, शहाणा, जाणकार.
सूर्यरवी, भास्कर, मित्र, आदित्य, सविता, अर्क, भानू, चंडांशू, दिनकर, दिनमणी, प्रभाकर, दिवाकर, अंबरीष.
सेनापती. सेनानी, सेनानायक.
स्वार्थीअलगर्जी, मतलबी.
सोनेसुवर्ण, कनक, कांचन, हिरण्य, हेम.
स्त्री ललना, महिला, अबला, वनिता, रमणी, अंगना. 
हत्तीगज, कुंजर, सारंग, नाग, पीलू, करी, करि.
हरीणमृग, कुरंग, सारंग.
हातहस्त, कर, पाणि, भुज, बाहू.
हृदयअंतःकरण, अंतर
हुशारचतुर, चलाख, कलमतराश, तरबेज, कसबी.
होडीनाव, नौका.
क्षेमकल्याण, हित.

अशाप्रकारे मराठी भाषेतील समानार्थी शब्द तुम्ही जाणून घेतले. या पुढील लेखात आपण विरुद्धार्थी शब्द जाणून घेणार आहोत. बोलताना तुम्ही हे नवनवीन शब्द वापराल तर तुमची भाषा समृद्ध होईल. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

Leave a Reply