You are currently viewing मराठी वाक्प्रचार संग्रह

मराठी वाक्प्रचार संग्रह

 1. अटकेपार झेंडा लावणे :- मोठा पराक्रम गाजविणे.
 2. अन्नाला जागणे :- उपकाराची जाणीव ठेवणे.
 3. अग्निदिव्य करणे :- सत्वासाठी प्राणांतिक संकटातून जाणे.
 4. अकांडतांडव करणे :- कारण नसताना ( रागाने) मोठा आरडाओरड करणे.
 5. अक्कल पुढे धावणे :- बुद्धीचा भलताच उपयोग करणे.
 6. अंग काढणे :- संबंध तोडून टाकणे.
 7. अळमटळम् करणे :- टाळाटाळ करणे.
 8. अभय देणे :- सुरक्षितपणाची हमी देणे.
 9. अनर्थ गुदरणे (ओढवणे) :- भयानक संकट येणे
 10. अठरा विश्वे दारिद्र्य असणे :- अतिशय गरीब असणे.
 11. अति तेथे माती होणे :- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट होतो
 12. अडकीत्यात सापडणे :- दोन्हीकडून संकटात सापडणे
 13. अत्तराचे दिवे लावणे :- बेसुमार उधळपट्टी करणे
 14. अखेर होणे :- मरण पावणे
 15. अवतार आटोपणे :- मरण पावणे , संपुष्टात येणे, नाश पावणे
 16. अर्ध्या वचनात असणे :- पूर्ण कह्यात असणे
 17. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे :- थोड्याशा यशाने हुरळून जाणे
 18. आत्मा थंड करणे :- मन तृप्त करणे
 19. अमृत कळा सोसणे :- जीव घाबरा होणे
 20. अमर होणे :- कायमची कीर्ती प्राप्त होणे

मराठी भाषेतील वाक्प्रचार

 1. असंगाशी संग करणे :- वाईट माणसाशी मैत्री करणे
 2. अवलंब करणे :- अनुसरणे
 3. अनुग्रह करणे :- कृपा करणे
 4. अनुमान करणे :- तर्क लावणे
 5. आमिष दाखविणे :- प्रलोभन दाखविणे
 6. अमुलाग्र बदलणे :- संपूर्णतया बदलणे
 7. आभाळ ठेंगणे होणे :- अत्यानंद होणे
 8. आकाशाला गवसणी घालणे :- महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे
 9. आगीत तेल ओतणे :- भांडण घडत असताना त्यात भर टाकणे
 10. आखाड्यात उतरणे :- वादास किंवा संघर्षास सिद्ध होणे
 11. आख्यान मांडणे :- कंटाळवाणे कथन करणे
 12. आड किंवा विहीर जवळ करणे :- आत्महत्या करणे
 13. आतडे तुटणे :- जीव कळवळणे
 14. आतड्याला पीळ पडणे :- काळजाला पाझर फुटणे, दयेने कळवळणे
 15. आग पाखडणे :- संतापून रागे भरणे
 16. आगापिछा नसणे :- एखाद्या बाबीला काहीही कारण परंपरा नसणे
 17. आकाश पाताळ एक करणे :- खूप आरडाओरडा करणे
 18. आनंद गगनात न मानणे :- अतिशय आनंद होणे
 19. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे :- कष्टाशिवाय चैन करणे
 20. आव आणणे :- नाटक करणे अवसान दाखवणे

मराठी वाक्प्रचार

 1. आहुती देणे :- प्राण अर्पण करणे, अग्नीस अर्पण करणे
 2. आगीतून निघून फुफाट्यात पडणे :- एका संकटातून दुसऱ्या संकटात पडणे
 3. आडवा पालघर घालणे :- एखादे कृत्य आड पदराने किंवा गुप्तपणे करणे
 4. आफळ साफळ करणे :- आदळ आपट करणे
 5. आभाळ कोसळणे :- मोठे संकट येणे
 6. आयुष्याची दोरी तुटणे :- मृत्यू येणे
 7. आकाश फाटणे :- मोठे संकट कोसळणे
 8. इंगा दाखविणे :- धडा देणे
 9. इतिश्री होणे :- शेवट होणे
 10. इटा माती वाहणे :- हलके शारीरिक कष्ट करणे
 11. इकडचा डोंगर तिकडे करणे :- कठीण गोष्ट साध्य करणे
 12. इंगा जिरवणे :- गर्व नाहीसा करणे
 13. उखाळ्या-पाखाळ्या काढणे :- एकमेकांच्या बऱ्यावाईट गोष्टी उकरून काढणे
 14. उपसर्ग होणे :- त्रास होणे
 15. उधाण येणे :- भरती येणे
 16. उजवा हात असणे :- अत्यंत विश्वासू मदतनीस असणे
 17. उच्चाटन करणे :- नष्ट करणे
 18. उखळ पांढरे होणे :- भरभराट होणे
 19. उचलबांगडी करणे :- हाकलून देणे दूर करणे
 20. उदक सोडणे :- पाणी सोडणे, त्याग करणे

वाक्प्रचार संग्रह

 1. उलटी अंबारी हाती येणे :- भीक मागण्याची वेळ येणे
 2. उकिरडे फुंकणे :- अत्यंत दरिद्र अवस्था येणे
 3. उष्टे खरकटे काढणे :- खालच्या दर्जाचे काम करणे
 4. उडत्या पाखराची पिसे मोजणे :- अत्यंत अवघड काम चतुराईने करून दाखविणे
 5. उभे जाळणे :- फार छळणे
 6. उभे धरणे :- कडक शिस्त लावणे
 7. उद्ध्वस्त होणे :- नाश पावणे
 8. उन्मळून पडणे :- मुळासकट उपटले जाऊन कोसळणे
 9. उन्हाची लाही फुटणे :- अतिशय कडक ऊन पडणे
 10. उराशी बाळगणे :- अंतकरणात जतन करून ठेवणे
 11. उष्ट्या हाताने कावळा न हाकलणे :- कधी कोणाला काहीही न देणे
 12. उरावर घेणे :- जबाबदारी स्वीकारणे
 13. उंबराचे फूल होणे :- दुर्मिळ होणे
 14. उंबरठे झिजवणे :- हेलपाटे मारणे
 15. उराशी धरणे :- प्रेमाने कवटाळणे
 16. उरी पोटी धरणे :- प्रेमाने समजूत घालणे
 17. उघडा पडणे :- निराधार होणे
 18. उपदेशाचे डोस पाजणे :- उपदेश करणे
 19. उतराई होणे :- उपकाराची फेड करणे
 20. उच्चाटन करणे :- हकालपट्टी करणे, समूळ नष्ट करणे

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

 1. ऊर दडपणे :- धास्ती वाटणे
 2. उर फोडून घेणे :- फार श्रम करणे
 3. भरून येणे :- अंतकरणात भावना दाटून येणे
 4. ऊत येणे :- अतिरेक होणे
 5. उंटावरून शेळ्या हाकणे :- स्वतः काहीही न करता दुसऱ्याला पोकळ उपदेश करणे 
 6. उहापोह करणे :- चर्चा करणे
 7. एकेरीवर येणे :- हमरीतुमरीवर येणे
 8. एरंडाचे गुऱ्हाळ :- व्यर्थ बडबड
 9. एका पायावर तयार असणे :- अतिशय उत्सुक असणे
 10. एकांडा शिलेदार :- एक हाती कार्य करणारा स्वबळावर कार्य करणारा
 11. एक ताटी जेवणे :- एकोप्याने राहणे
 12. एक घाव दोन तुकडे करणे :- ताबडतोब निर्णय घेणे
 13. ओले कोरडे खाणे :- कसाबसा निर्वाह करणे
 14. ओटी भरणे :- जिव्हाळ्याच्या माणसाला सदिच्छा देणे
 15. ओटीत घेणे :- दत्तक घेणे जबाबदारी स्वीकारणे
 16. ओठा बाहेर काढणे :- बोलून दाखविणे
 17. औषध नसणे उपाय नसणे
 18. औषधालाही नसणे अजिबात नसणे
 19. अंगावर मुठभर मास चढणे धन्यता वाटणे
 20. अंथरूण पाहून पाय पसरणे उत्पन्नाच्या मानाने खर्च करणे

मराठी वाक्प्रचार

 1. अंगाचा तिळपापड होणे भयंकर राग येणे
 2. अंगाची लाही लाही होणे मनाचा जळफळाट होणे
 3. अंग काढणे संबंध तोडणे
 4. अंग झाडून मोकळे होणे जबाबदारी झटकून बाजूस होणे
 5. अंगावर काटा उभा राहणे भीतीने अंगावर शहारा येणे
 6. अंतर देणे सोडून देणे
 7. अंग चोरणे कामात कुचराई करणे
 8. अंकित करणे पूर्ण ताब्यात घेणे
 9. अंग झाकणे एखाद्या कामाशी आपला असलेला संबंध उघड न करणे
 10. अंग झाडून काम करणे आळस झटकून काम करणे
 11. अंगावर घेणे जबाबदारी घेणे
 12. अंग झडणे कृष होणे बारीक होणे
 13. अंतरीचा तळीराम गार होणे मनातील इच्छा पूर्ण होणे
 14. कळी खुलणे प्रसन्न होणे
 15. कवडी किमतीचे शूद्र
 16. कणिक तिंबणे भरपूर मार देणे
 17. कढ येणे उमाळा येणे गहिवर येणे
 18. कपिलाषष्ठीचा योग येणे दुर्मिळ संधी येणे
 19. पाय पांढरे होणे गरीबी प्राप्त होणे
 20. कच्चे मडके अप्रगल्भ माणूस

अर्थासहित वाक्प्रचार

 1. कडेलोट होणे पराकाष्ठा होणे
 2. कल्हई करणे सारवासारव करणे
 3. कणीस जाणे मरणे
 4. कळस होणे शिखर गाठणे
 5. कपाळ फुटणे दुर्दैव उडवणे
 6. करारमदार करणे आपापसात एखादी गोष्ट ठरविणे
 7. कसुर न करणे चूक हयगय न करणे
 8. कसाला लागणे परीक्षेत उतरणे
 9. कच खाणे माघार घेणे
 10. करुणा भाकणे दयेची याचना करणे
 11. कपाळाला आठ्या पाडणे नाराज होणे
 12. कलम करणे :- निरुपयोगी करून टाकणे
 13. कानमंत्र देणे गुप्त सूचना देणे
 14. कान फुंकणे एखाद्याविषयी दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे
 15. कानाखाली वाजविणे थप्पड मारणे
 16. कातडे पांघरणे उसने अवसान आणणे
 17. कानावर हात ठेवणे ऐनवेळी जबाबदारी टाळणे
 18. कानाला खडा लावणे पुन्हा एखादी चूक न करण्याचा निश्चय करणे
 19. कावरेबावरे होणे बावरणे
 20. काळाच्या उदरात गडप होणे नष्ट होणे

मराठी भाषेतील वाक्प्रचार संग्रह

 1. कानाला चावा घेणे नको त्या गोष्टी सांगून दुसऱ्याचे मन कलुषित करणे
 2. कान टोचणे योग्य गोष्ट सुनावणे
 3. कान टवकारून ऐकणे लक्षपूर्वक ऐकणे
 4. कपाळावर हात मारणे नशिबाला दोष देणे
 5. कान विटणे तीच तीच गोष्ट वारंवार ऐकून कंटाळून जाणे
 6. कान लांब होणे बेअक्कल पणे वागणे
 7. काळजाला झोंबणे कटू बोल मनाला लागणे
 8. कालवश होणे मरण पावणे
 9. कामास येणे रणांगणावर मृत्यू येणे
 10. कातड्याचे जोडे करणे सर्वस्व वेचणे
 11. काळीज फाटणे दुःख विव्हल होणे
 12. कालवाकालव होणे चिंतेने किंवा भीतीने पोटात कसेतरी होणे
 13. काळ धर्म जाणे मरणे
 14. काळाक्षरी नाव घालणे शिलालेखात ज्यास वृत्ती दिली त्याचा उल्लेख करणे
 15. काळजाचे पाणी पाणी होणे अतिशय घाबरून जाणे
 16. काथ्याकूट करणे निरर्थक वाद-विवाद करणे
 17. काट्याचा नायटा होणे शुल्लक कारणावरून अनर्थ ओढवणे
 18. कायापालट होणे संपुर्ण बदल होणे
 19. काटा काढणे नकोशा गोष्टीचा वा व्यक्तीचा नाश करणे
 20. कानोसा घेणे चाहूल घेणे

वाक्प्रचार

 1. काळे करणे निघून जाणे
 2. काळजाचे कोळसे होणे सर्व इच्छा उमेद नष्ट होणे
 3. कानाडोळा करणे दुर्लक्ष करणे
 4. काळावर नजर ठेवणे भविष्यकाळ जाणून घेणे
 5. काहूर माजणे विचार वा भावनांचा गोंधळ हाेणे
 6. काम उपसणे खूप काम करणे
 7. कास धरणे आधार घेणे
 8. कागदी घोडे नाचवणे इकडून तिकडे असा सतत पत्रव्यवहार होत राहणे
 9. काडीमोड घेणे संबंध तोडणे
 10. कान उघडणी करणे चुकीची वा दोषाची जाणीव करून देणे
 11. किडून घोळ होणे संपूर्णतः किडून जाणे
 12. कुत्रा हाल न खाणे कुणीही न विचारणे
 13. कुरापत काढणे भांडण उकरून काढणे
 14. कुंपणाने शेत खाणे विश्वासू माणसाने घात करणे
 15. कोपरापासून हात जोडणे संबंध न यावा म्हणून प्रार्थना करणे
 16. कोंबडी झुंजवणे भांडण लावून देऊन मजा पाहणे
 17. कंठ फुटणे शब्द उच्चार प्रौढ किंवा खणखणीत होणे, कधीही न बोलणाऱ्याने बोलणे
 18. केसाने गळा कापणे विश्वासघात करणे
 19. कंठ दाटून येणे गहिवरून येणे
 20. कुंकू पुसणे वैधव्य प्राप्त होणे

वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ

 1. कंबर कसणे निश्चयाने कामाला लागणे सज्ज होणे
 2. कंठशोष करणे ओरडून गळा सुकविणे
 3. खडा टाकून पहाणे अंदाज घेणे
 4. खिरापत करणे उधळपट्टी करणे
 5. खिशात टाकणे लांबवणे फसवणे
 6. खसखस पिकणे एकाच वेळी बऱ्याच जणांना हसू येणे
 7. काखा वर करणे जवळ काही नाही असे दाखविणे
 8. खडे फोडणे दोष देणे
 9. खडे चारणे पराभूत करणे
 10. खापर फोडणे दुसऱ्यावर दोष देणे
 11. खो घालणे अडथळा निर्माण करणे
 12. खोगिर भरती करणे बिन उपयोगाच्या व्यक्तींची भरती करणे
 13. खर्ची पडणे कामी येणे
 14. खूणगाठ बांधणे पक्के ध्यानात ठेवणे 
 15. खिळखिळे होणे मोडकळीस येणे
 16. खाजवुन खरुज काढणे मुद्दाम भांडण उकरून काढणे
 17. खाल्ल्या घरचे वासे मोजणे केलेले उपकार विसरणे
 18. खिळवून ठेवणे स्थिर करून ठेवणे
 19. खस्ता खाणे कष्ट करावे लागणे
 20. गळ टाकून पाहणे प्रयत्न करणे

मराठी वाक्प्रचार

 1. गळ्याशी येणे नुकसान होणे
 2. गाल रंगविणे श्रीमुखात देणे
 3. गाशा गुंडाळणे चालते होणे
 4. गिळंकृत करणे लबाडीने अपहरण करणे
 5. गुरु मंत्र देणे लबाडीचा सल्ला देणे
 6. गुळ खोबरे देणे लाच देणे
 7. गुळाचा गणपती जड व आळशी माणूस
 8. गोंडा घोळणे खुशामत करणे
 9. गुळगुळीत करणे खरडपट्टी करणे
 10. गळ घालणे आग्रह धरणे 
 11. गावी नसणे बिलकुल माहित नसणे
 12. गंगेत घोडे न्हाणे एखादे काम कसेबसे पार पडणे
 13. गर्भगळीत होणे अतिशय घाबरणे
 14. गाय होणे रंजीस येणे 
 15. गंगाजळी राखून ठेवलेले द्रव्य
 16. गंडांतर येणे संकट येणे
 17. ग्रंथ आटोपणे मरण पावणे
 18. गयावया करणे काकुळतीस येणे
 19. गहजब होणे बोभाटा होणे
 20. गय करणे क्षमा करणे

वाक्प्रचार संग्रह

 1. गगन ठेंगणे होणे खूप आनंद होणे
 2. गर्जना करणे मोठ्याने ओरडणे
 3. गळी उतरणे पटणे समजणे
 4. गडगडून हसणे मोकळ्या मनाने हसणे
 5. गळ्याला तात लागणे प्राणघातक संकटात सापडणे
 6. गाई पाण्यावर येणे रडू येणे
 7. गारुड करणे जादूटोणा करणे
 8. गुळणी फोडणे स्पष्ट शब्दांत सांगणे
 9. गुळणी धरून बसणे गप्प बसणे
 10. ग्रहण सुटणे काळजी नाहीशी होणे
 11. गाल फुगवून बसणे रुसून बसणे
 12. गाल बसणे बारीक होणे
 13. गालावर गाल चढणे प्रकृती सुधारणे
 14. गळ्यातील ताईत होणे अतिशय प्रिय होणे
 15. गदगदून येणे अंतकरण भरून येणे
 16. घशाला कोरड पडणे अतिशय घाबरणे
 17. घट पट करणे वितंडवाद घालने
 18. गळ्यात घोरपड बांधणे नसती जबाबदारी लादणे
 19. घिसाड घाई करणे कसेतरी काम करून टाकणे
 20. घोडे मारणे नुकसान करणे

मराठी भाषेतील वाक्प्रचार

 1. घोडामैदान जवळ असणे कसोटीची वेळ जवळ येणे
 2. घोडे पेंड खाणे अडचण निर्माण होणे
 3. घटका भरणे मरण अगदी जवळ येणे
 4. घर डोक्यावर घेणे अतिशय गोंगाट करणे
 5. घडा भरणे शेवटचा परिणाम भोगण्याची वेळ घेणे
 6. घरावर तुळशीपत्र ठेवणे घरादाराची आशा सोडणे
 7. घर धुऊन नेणे सर्व मालमत्तेची चोरी होणे
 8. घालून पाडून बोलणे दुसर्‍याला लागेल असे बोलणे
 9. घर पुजणे आपले काम सोडून दुसऱ्यांच्या भेटीगाठी घेणे
 10. घर तुटणे एखाद्याशी असलेले स्नेहबंध सुटणे
 11. घरावर गवत रुजणे माणसानं अभावी घर ओस पडणे
 12. घर बसणे घरातील कर्त्या पुरुषाच्या विना विपन्नावस्था येणे
 13. घाम गाळणे खूप कष्ट करणे
 14. घोडे मध्ये अडणे प्रगतीत खंड पडणे
 15. घोडे पुढे ढकलणे स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे
 16. घर जोडणे एखाद्या घराण्याशी वैवाहिक संबंध जोडणे
 17. धूळ चारणे पूर्ण पराभव करणे
 18. धूम ठोकणे पळून जाणे
 19. धाबे दणाणणे अतिशय घाबरणे
 20. धरणे येणे मरण येणे

वाक्प्रचार

 1. चर्वित चर्वण करणे त्याच त्याच विषयावर सतत चर्चा करणे
 2. चर्पट पंजरी लावणे कंटाळवाणी बडबड करणे
 3. चाकोरीतून जाणे ठराविक व परंपरागत मार्गाने जाणे
 4. चंचुप्रवेश होणे शिरकाव होणे
 5. चांभार चौकशी करणे नसती बारीक चौकशी करणे
 6. चार हात होणे लग्न होणे
 7. चिऱ्यावरची रेघ न बदलणारी गोष्ट
 8. चुटक्यांचे मांडव बढाई खोरीचे बोलणे
 9. चमकने प्रसिद्ध पावणे 
 10. चार शब्द लहानसे भाषण
 11. चोरावर मोर होणे शेरास सव्वाशेर होणे
 12. चांभार चाळणी करणे चाल ढकल करणे
 13. चंग बांधणे निश्चय करणे
 14. चष्म्यातून पाहणे विशिष्ट दृष्टिकोनातून बघणे
 15. चर्हाट वळणे कंटाळवाणे कथन करणे
 16. चटणी करणे नाश करणे
 17. चटका बसणे दुःख होणे
 18. चळाचळा कापणे अतिशय भीती वाटणे
 19. चकार शब्द न काढणे काहीही न बोलणे
 20. चालत्या गाडीला खीळ घालणे व्यवस्थित चाललेल्या कामात अडथळे आणणे

मराठी वाक्प्रचार

 1. चाह असणे आवड असणे
 2. चाह करणे वाहवा करणे 
 3. चारी मुंड्या चीत करणे संपूर्ण पराभव करणे
 4. चोराच्या उलट्या बोंबा स्वतःची चुक दुसऱ्याच्या माथी मारणे
 5. चंदन करणे नाश करणे
 6. चव्हाट्यावर आणणे उघडकीस आणणे
 7. चांदी उडणे नाश होणे
 8. चुटपुट लागणे हुरहूर लागणे
 9. चुलीला अक्षता देणे जेवणासाठी आग्रहाचे आमंत्रण देणे
 10. चूर होणे दंग होणे
 11. चोरी असणे एखादी गोष्ट उघडपणे करता न येणे 
 12. चौदावे रत्न दाखविणे खूप मार देणे 
 13. चार पैसे गाठीला बांधणे थोडीफार बचत करणे
 14. चाहूल लागणे चिन्ह दिसणे 
 15. 36 चा आकडा असणे वैर असणे 
 16. छक्के-पंजे करणे लबाडी करणे 
 17. छू करणे भांडणास प्रवृत्त करणे 
 18. छप्पर फाडून देणे भरपूर देणे
 19. छातीला हात लावून सांगणे खात्रीपूर्वक सांगणे 
 20. जमीन तयार करणे प्रारंभाची सिद्धता करणे 

अर्थासहित वाक्प्रचार

 1. जिभेला हाड नसणे वाटेल ते बोलणे 
 2. जीवावर उदार होणे प्राणाची पर्वा न करणे
 3. जिवाचे रान करणे अतिशय तळमळीने काम करणे
 4. जीव भांड्यात पडणे काळजी दूर होणे 
 5. जगाचा निरोप घेणे मरण येणे 
 6. जीवाचे बरे वाईट करणे आत्महत्या करणे 
 7. जीव मेटाकुटीस येणे फार त्रास होणे 
 8. जरब बसविणे धाक दाखविणे
 9. जगरहाटी पाळणे रीतिरिवाज पाळणे 
 10. जन्माचे सोने होणे कायमचे हित होणे 
 11. जय जयकार करणे गुणगान करणे 
 12. जमीनदोस्त होणे मातीमोल होणे 
 13. जनावरांचे जीणे जगणे त्रास सहन करीत जगणे 
 14. जाब विचारणे उत्तर विचारणे
 15. जाहीर करणे सर्वांना कळविणे 
 16. जीवाची मुंबई करणे चैन करणे 
 17. जीभेची टकळी चालणे निरर्थक बडबड करणे 
 18. जिभ विटाळणे वाईट उच्चार करणे 
 19. जिवाचा आटापिटा करणे अतिशय कष्ट करणे
 20. जीभ चावणे घाबरून चपापणे 

वाक्प्रचार संग्रह

 1. जीव लावणे लळा लावणे 
 2. जीव टाकणे अतिशय धडपड करणे 
 3. जीवदान देणे वाचविणे 
 4. जीव टांगणीला लागणे चिंता वाटणे 
 5. जीव मुठीत धरणे मन घट्ट करणे 
 6. जेरबंद करणे अटक करणे
 7. जीव कानात गोळा होणे सर्व शक्ती कानात एकवटून ऐकणे
 8. जुना पुराना खाक्या वापरणे पूर्वीचा हुकुमी उपाय योजने
 9. जेरीस आणणे शरण यावयास भाग पाडणे 
 10. जपमाळ ओढणे एखाद्या गोष्टीचा निदिध्यास लागणे
 11. जीव ठिकाणी नसणे चिंताग्रस्त होणे 
 12. झुंबड उडणे खूप गर्दी होणे
 13. झाडा देणे परिणाम भोगणे 
 14. झिगझिग करणे ओढे वेढे घेणे 
 15. झेंगट लावणे उपद्व्याप मागे लावणे
 16. झळ लागणे परिणाम भोगावा लागणे 
 17. झक मारणे न करावयाची गोष्ट केल्याने दोष पदरात घेणे
 18. झुरणीला लागणे शरीराच्या किंवा मनाच्या व्यथेने झिजणे
 19. झाकले माणिक प्रकाशात न आणलेली अत्यंत गुणी व्यक्ती
 20. टक्केटोणपे खाणे ठेचा खाणे

वाक्प्रचार आणि अर्थ

 1. झेंडा नाचविणे आपला पराक्रम सांगणे 
 2. डोळ्यात सलणे मत्सर वाटणे 
 3. डोळा ठेवणे अभिलाषा धरणे 
 4. डोळे मिटणे मरणे
 5. डोळ्यात धूळ फेकणे सहजासहजी फसवणे
 6. डोळ्याचे पारणे फिटणे नेत्रसुख घेऊन समाधान होणे
 7. डोळ्यात तेल घालणे अतिशय दक्ष राहणे
 8. डरकाळी फोडणे गर्जना करणे 
 9. डाग देणे चटका देणे 
 10. डाळ न शिजणे काहीही इलाज न चालणे
 11. डोळे उघडणे खरी परिस्थिती माहीत झाल्याने पश्चात्ताप होणे
 12. डोके भडकणे संतापणे 
 13. डोळ्यावर येणे मत्सर निर्माण होणे
 14. डोके देणे धीराने तोंड देणे 
 15. डोक्यात भरविणे भरीस घालणे 
 16. डोळे दिपणे आश्चर्य चकित होणे
 17. डोके वर काढणे उदयास येणे 
 18. डोळे विस्फारुन पाहणे आश्चर्याने पाहणे 
 19. डाव साधने संधीचा उपयोग करून घेणे
 20. डोळ्यावर धूर येणे सत्तेचा अगर संपत्तीचा गर्व होणे 

मराठीतील वाक्प्रचार संग्रह

 1. डोक्यावर बसविणे फाजील लाड करणे
 2. डोळ्यास डोळा लागणे झोप येणे
 3. डोळ्याखालून घालणे निरीक्षण करणे 
 4. डोक्यात प्रकाश पडणे पूर्णपणे समजणे 
 5. डोके खाजवणे युक्ति शोधणे
 6. डोक्यावर मिर्‍या वाटणे वरचढ होणे 
 7. डोक्यावर खापर फोडणे दोषी नसलेल्या माणसाला दोष देणे 
 8. डोळ्यावर कातडे ओढणे जाणून बुजून दुर्लक्ष करणे 
 9. डोळा चुकविणे भेट घेण्याचे टाळणे
 10. डोळ्यात खूपणे यश सहन न होणे 
 11. डोळे खिळून राहणे वस्तूकडे एक टक बघत राहणे
 12. डोळे पाणावणे डोळ्यात पाणी येणे 
 13. डोळ्यात प्राण आणणे अतिशय आतुर होणे 
 14. डोळे फाडून पाहणे तीक्ष्ण नजरेने पाहणे
 15. डांगोरा पिटणे जाहीर करणे 
 16. डोळ्यातील काजळ चोरणे अतिशय कौशल्याने चोरी करणे 
 17. तमाशा करणे गोंधळ घालणे 
 18. तुकडे मोडणे आश्रित होणे
 19. तोंड रंगविणे श्रीमुखात देणे 
 20. तोंडसुख घेणे रागावणे 

वाक्प्रचार – मराठी व्याकरण

 1. तोंड दाबी करणे लाच देणे
 2. तळपायाची आग मस्तकात जाणे अतिशय संताप येणे 
 3. तारे तोडणे मूर्खपणा दिसून येईल अशी बडबड करणे
 4. तोंडात बोट घालणे आश्चर्यचकित होणे 
 5. तुनतुने वाजवणे तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे 
 6. तेरड्याचे फुल चंचल स्वभावाची व्यक्ती
 7. तारेवरचा नाच अवघड गोष्ट 
 8. ताऊन सुलाखुन निघणे कसोटीस उतरणे 
 9. तिरपागडे होणे अपेक्षित नसलेले भलतेच काहीतरी घडणे
 10. तत्वज्ञान तोकडे पडणे कोणताही विचार अपुरा वाटणे 
 11. तडाख्यातून सुटणे संकटातून सुटणे 
 12. तर्क चालविणे अंदाज करणे
 13. तामिली करणे हुकुमाची अंमलबजावणी करणे
 14. ताव मारणे भरपूर खाणे 
 15. तीडा पडणे समस्या निर्माण होणे 
 16. तोफा डागणे खूप रागावून बोलणे
 17. तोंड देणे प्रतिकार करणे 
 18. तोंड गोरेमोरे होणे ओशाळणे 
 19. तोंडवर करून बोलणे उलट बोलणे
 20. तोंडावर येणे अगदीच जवळ येणे 

वाक्प्रचार – शब्द समृद्धी

 1. तोल सुटणे अति राग येणे सयंम सुटणे
 2. तोडीसतोड असणे त्याच क्षमतेचा असणे बरोबरीचा असणे
 3. तोंडाचा पट्टा सुरू होणे खूप बोलणे 
 4. तोंडघशी पाडणे विश्वासघात करणे
 5. तोंडघशी पडणे दुसऱ्याने केलेल्या विश्वासघातामुळे फशी पडणे 
 6. तोंडचे पाणी पळणे खूप भीती वाटणे
 7. तोंड दाबून (बुक्क्यांचा) मार निरपराध माणसाचं भोगावे लागणारे शिक्षा की ज्या विरुद्ध ब्र काढावयाची सोय नसते
 8. तोंडाला कुलूप लावणे गप्प बसणे 
 9. तोंड पूजा करणे निरर्थक स्तुती करणे 
 10. तंबी देणे ताकीद देणे
 11. तारांबळ उडणे त्रेधातिरपिट उडणे
 12. तळपट होणे नाश होणे 
 13. तळी भरणे कार्य करण्यासाठी सगळी सिद्धता होणे
 14. थरकाप होणे खूप घाबरणे
 15. थांगपत्ता न लागणे पूर्ण कल्पना न येणे ताकास तूर लागू न देणे
 16. थुंकी झेलणे हांजी हांजी करणे 
 17. थोबाड रंगविणे तोंडात मारणे
 18. थैमान घालणे धिंगाणा घालणे
 19. थेर करणे चाळे करणे
 20. थंडा फराळ करणे उपाशी राहणे

वाक्प्रचार

 1. दाती तृण धरणे शरण येणे
 2. द्राविडी प्राणायाम करणे साध्या सरळ बाबींसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे
 3. दात घशात घालणे फजिती करणे 
 4. दिवे लावणे बेअब्रू करणे 
 5. दुधात साखर पडणे आनंदात आणखी भर पडणे
 6. देवाज्ञा होणे देहावसान होणे मरण पावणे देवाघरी जाणे देह ठेवणे
 7. दगाबाजी करणे विश्वास घात करणे 
 8. दमन करणे नष्ट करणे 
 9. दत्त म्हणून उभे राहणे अचानक उपस्थित राहणे
 10. दशा होणे वाईट अवस्था होणे 
 11. दगडाखाली हात सापडणे अडचणीत येणे 
 12. दगडाला शेंदूर फासणे एखाद्याला अकारण मोठेपण देणे
 13. दखल घेणे काळजी घेणे 
 14. दगड टाकून ठाव पाहणे काही यत्न करून एखाद्या गोष्टीचा अंदाज घेणे
 15. दगडाला पाझर फोडणे निर्दय मनुष्याच्या मनात दया उत्पन्न करणे 
 16. दगडाचा दोर करणे अशक्य गोष्ट शक्य करणे
 17. दादापुता करणे गोड बोलून मन वळविणे 
 18. दडी मारणे लपून बसणे 
 19. दहा गेले पाच उरले आयुष्याचा बराचसा भाग संपून थोडा बाकी राहणे
 20. दिवे ओवाळणे कमी प्रतीच्या माणसाला मोठा समजून त्याचे पोवाडे गाणे 

वाक्प्रचार – अर्थ

 1. दात ओठ खाणे खूप रागावणे
 2. दातखिळी बसणे गप्प बसणे 
 3. दिग्विजय करणे सर्वत्र विजय मिळविणे 
 4. दीक्षा देणे एखाद्या कार्याचा उपदेश करणे 
 5. दुवा देणे भले म्हणणे 
 6. दुरावा येणे परकेपणा निर्माण होणे 
 7. दूरदर्शीपणा असणे दूरवरचा विचार करण्याची क्षमता असणे
 8. दुःख वेशीवर टांगणे संकटे लोकांपुढे मांडणे 
 9. दुःखावर डागण्या देणे दुखी माणसाला टोचून बोलणे 
 10. देहदंड करणे शारीरिक शिक्षा देणे 
 11. देह कारणी लावणे चांगल्या कामासाठी देह शिजवणे
 12. नाकी नऊ येणे बेजार होणे 
 13. नाक घासणे शरण जाणे 
 14. नांगी ठेचणे पूर्ण पराभूत करणे
 15. नक्शा उतरविणे जिरवणे
 16. नक्राश्रू ढाळणे खोटे दुःख दाखविणे 
 17. नाडी सापडणे अंदाज येणे
 18. नमनालाच घडाभर तेल जाळणे सुरुवात करण्यास विलंब करणे 
 19. नाकावर पदर येणे वैधव्य येणे 

मराठी वाक्प्रचार

 1. नाकासमोर चालणे सरळ मार्गाने चालणे 
 2. नजर करणे भेट म्हणून देणे
 3. नावाला बट्टा लावणे काळिमा लावणे 
 4. नाकाने कांदे सोलणे उगाच ऐट करणे 
 5. नाकाशी सुत धरणे मरणपंथाला लागणे 
 6. नाकी दम येणे त्रासणे 
 7. नाक मुरडणे नापसंती दाखविणे 
 8. नाकाला मिरच्या झोंबणे मनाला फार लागणे 
 9. निवारण करणे दूर करणे
 10. निर्वान होणे निधन पावणे 
 11. निकष लावणे कस लावणे 
 12. निभाव लागणे टिकाव लागणे 
 13. निर्वाणीचा इशारा देणे अंतिम सूचना देणे 
 14. निसंग होणे सर्व प्रकारची बंधने तोडणे
 15. निसर्ग पणाने बसणे आरशासारखे बसणे 
 16. नावाला नसणे थोडा हिस्सा सुद्धा सहभागी नसणे
 17. नावारुपास येणे वैभवाला वामान मान्यतेला येणे
 18. निळ नाचणे एखाद्याविषयी खोटी बातमी पसरविणे 
 19. पाण्यावरची रेघ क्षणभंगुरता 
 20. पाण्यात पाहणे वैर करणे 

मराठी व्याकरण -वाक्प्रचार

 1. पायाला भिंगरी असणे सारखे हिंडणे
 2. पोटात शिरणे मनातले जाणणे 
 3. पंढरी पिकणे भरभराट होणे
 4. पाचवीला पूजने जन्माची सवय लागणे 
 5. पाळेमुळे खणून काढणे पूर्ण नाश करणे 
 6. पंढरीचा डोळा गावचा जागल्या
 7. पगडा बसणे वर्चस्व निर्माण होणे 
 8. पाया घालणे आरंभ करणे 
 9. पुराण सांगणे कंटाळवाणे कथन करणे 
 10. दोबारा करणे पलायन करणे 
 11. पतन पावणे मरण पावणे प्रस्थान ठेवणे 
 12. पथ्यावर पडणे खटपट न करता एखादी गोष्ट मनासारखी होणे
 13. पदरचे घालने आपल्याजवळचे खर्च करणे 
 14. पदरी पडणे वाट्यास येणे 
 15. पाणी लागणे एखाद्याच्या संगतीने त्याचा गुण येणे 
 16. पाणी पडणे व्यर्थ होणे
 17. पाठीचे धिरडे करणे खूप मारणे 
 18. पांघरून घालणे दोष झाकणे 
 19. पाठीमागे भुंगा लावणे सतत त्रास देणे 
 20. पदरमोड करणे शिलकीतील पैसा खर्च करणे 

वाक्प्रचार संग्रह

 1. पदराला गाठ मारणे कामाचा अनुभव घेऊन सुधारणा करणे 
 2. पाणी मुरणे भानगड असणे
 3. पोटाला मारणे उपाशी राहणे पोट बांधणे 
 4. प्राक्तनाचा खेळ नशीबाचा खेळ 
 5. प्रेमाचे भरते येणे खूप प्रेम वाटणे
 6. प्रस्थ माजविणे अकारण प्रतिष्ठा देणे 
 7. फुटाने उडणे ताडताड बोलणे 
 8. फुलात घालून ठेवणे अतिशय जपणे 
 9. फुलून जाणे भरून जाणे प्रसन्न होणे 
 10. फत्ते होणे विजयी होणे 
 11. फस्त करणे खाऊन संपविणे
 12. फडशा पाडणे संपविणे
 13. फतकल मारून बसणे मांडी घालून बसणे 
 14. फारकत घेणे दूर होणे काडीमोड घेणे 
 15. हुशारकी मारणे बढाई मारणे 
 16. फाटे फोडणे उगाच अडचणी निर्माण करणे
 17. फरारी होणे पळून जाणे 
 18. फशी पडणे फसून संकटात पडणे 
 19. फळास येणे फलद्रूप होणे 
 20. फाटा देणे कमी करणे नाहीसे करणे

मराठी वाक्प्रचार

 1. फावड्याने पैसा ओढणे अतोनात पैसा मिळविणे 
 2. फाशी देणे गळ्याला दोरीचा फास लावून प्राण घेणे 
 3. फासा टाकून पाहणे एखादी वस्तू मिळवण्यासाठी प्रयत्न करून पाहणे
 4. हाताचा /सोयीचा पडणे आपणास हवी तशी अनुकूल गोष्ट घडून येणे 
 5. फुली घालणे नकार देणे
 6. बांगड्या भरणे नामर्द ठरणे 
 7. बावनकशी सोने अस्सल गोष्ट 
 8. बारावा बृहस्पती असणे वैर असणे
 9. बीजारोपण करणे प्रारंभ करणे 
 10. बाळकडू मिळणे लहानपणापासून शिकवण मिळणे 
 11. बाळंतपण करणे खटाटोप करणे
 12. बुडती येणे नुकसान येणे 
 13. बजबजपुरी माजणे अव्यवस्था /गोंधळ माजणे 
 14. बडेजाव करणे परिस्थिती नसताना मोठेपणाचा आभास निर्माण करणे 
 15. बत्तिशी रंगविणे दातातून रक्त निघून दात रंगतील असे मारणे थोबाड फोडणे
 16. बत्तीशी दाखविणे दुसऱ्याला फजित करण्यासाठी हसून लाजविने बब्रा करणे भरपूर बोभाटा करणे 
 17. बस्तान बिघडणे अव्यवस्थितपणे सारे बिघडून जाणे
 18. बळी पडणे भक्षस्थानी पडणे
 19. बंब वाजवणे फजिती होणे 
 20. बलिदान करणे प्राण अर्पण करणे 

वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ

 1. ब्रम्हांड आठवणे अतिशय दुःख होणे 
 2. बोळवण करणे निरोप घेणे 
 3. 12 वाजविणे नाश करणे
 4. बाहुली प्रमाणे नाचविणे आपल्या तंत्राने वागविणे 
 5. बोटे मोडणे चरफडणे 
 6. बुचकळ्यात पडणे गोंधळून जाणे 
 7. भिजते घोंगडे रेंगाळलेले काम
 8. भिकेचे डोहाळे लागणे दरिद्री पणाने वागणे 
 9. भीक न घालणे न जुमानणे 
 10. मधाचे बोट लावणे लालूच दाखविणे 
 11. मामा बनविणे फसवणे
 12. मिशांना तूप लावणे श्रीमंतीचा डोल मिरवणे 
 13. मुठ दाबणे लाच देणे 
 14. मात्रा लागू पडणे उपाय बरोबर ठरणे
 15. महाभारत घडणे मोठे भांडण होणे 
 16. मोगलाई असणे अंदाधुंदी असणे 
 17. मनातील अढी मनातील कटुता 
 18. मोकळे कुरण सापडणे स्वार्थ साधण्याची संधी मिळणे
 19. मनात भरणे पसंत पडणे 
 20. मन येणे इच्छा होणे 

अर्थासहित वाक्प्रचार

 1. मन जाणे इच्छा जाणे 
 2. मनात विकल्प येणे मन द्विधा होणे 
 3. मन खाणे मनाला टोचणी लागणे 
 4. माशा मारीत बसणे निरुद्योगी असणे
 5. माया पातळ होणे प्रेम कमी होणे 
 6. मानगुटीवर बसणे अगदी पिच्छा पुरविणे 
 7. मागमूस नसणे ठावठिकाणा नसणे
 8. मरता-मरता हातपाय झाडणे असेल नसेल ती सर्व शक्ती एकवटून प्रयत्न करणे
 9. माग काढणे तपास लावणे 
 10. मागचे लोन पुढे पोचविणे पूर्वापार चालत आलेले रीतीरिवाज तसेच पुढे चालू ठेवणे 
 11. मातीआड करणे पान पलटने नष्ट करणे पडदा टाकणे
 12. मात्रा वर असणे वरचढ असणे 
 13. माय विणे कोणीही धाडस करणार नाही असे समजणे 
 14. माशी शिंकणे कामात अडचण येणे 
 15. मिशीवर ताव मारणे हुशारकी मारणे 
 16. मुसंडी मारणे एकदम धडक मारणे
 17. मक्ता असणे एकाधिकार असणे 
 18. मोका साधने संधी साधने 
 19. राशीस बसणे त्रास देणे 
 20. राम म्हणणे मरणे 

मराठी भाषेतील वाक्प्रचार

 1. एकापेक्षा एक शूर वा कर्तबगार व्यक्ती 
 2. रामराज्य असणे शांती सुबत्ता नांदणे
 3. रामायण सांगणे घडलेल्या गोष्टींचे कथन करणे 
 4. राजापुरी गंगा अकस्मात उद्भवणारी गोष्ट 
 5. रुढीचे बुजगावणे खोटे भय 
 6. रुपेरी बेडी स्वातंत्र्यावर बंधन आणणारी बाब 
 7. राजपाट भोगणे खूप वैभव भोगणे 
 8. रामराम ठोकणे कायमचा निरोप घेणे 
 9. लहान तोंडी मोठा घास घेणे कमी वयाच्या व्यक्तीने अधिक वयाच्या व्यक्तीस शिकविणे
 10. लंकेची पार्वती दरिद्री स्त्री 
 11. लाखोली वाहणे शिव्या देणे 
 12. लोणी लावणे खुशामत करणे 
 13. लाख-मोलाची गोष्ट फार महत्त्वाची गोष्ट 
 14. लाथ मारणे त्याग करणे 
 15. लकडा लावणे तगादा लावणे 
 16. लाड पुरविणे हौस पुरविणे 
 17. अंगाची लाही होणे खूप संताप येणे 
 18. लटक्याला मोल येणे खोट्या गोष्टीस महत्त्व येणे
 19. ललाट रेषा उजळणे भाग्य उजळणे 
 20. लाचार होणे निरुपाय होऊन शरण येणे

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

 1. लांडगेतोड करणे शत्रूचा धुव्वा उडविणे 
 2. वरात काढणे धिंड काढणे 
 3. विरजण पडणे विरस होणे 
 4. वकिली करणे बाजू घेणे समर्थन करणे
 5. विस्तार होणे वंशवृद्धी होणे
 6. वेदवाक्य मानणे प्रमाण मानणे 
 7. वर डोके काढणे उर्जितावस्था लाभणे
 8. वज्रलेप होणे पक्के होणे 
 9. वाऱ्याची मोट बांधणे अशक्य गोष्ट करू पाहणे
 10. वड्याचे तेल वांग्यावर काढणे एकाचा राग दुस-यावर काढणे 
 11. वनवास भोगणे हाल-अपेष्टा सहन करणे 
 12. वीरश्री संचारणे अंगी खूप शौर्य येणे 
 13. वाकडा भाव असणे मनात राग असणे
 14. वचपा काढणे बदला घेणे
 15. वडाची साल पिंपळाला लावणे नसता संबंध जोडणे 
 16. वर्दळीवर येणे भांडणास तयार होणे 
 17. वारा पडणे वारा वाहणे बंद होणे
 18. वारा पिणे बेभान होणे 
 19. विधिनिषेध असणे योग्य की अयोग्य याचा विचार न करणे 
 20. वीट येणे कंटाळा येणे नकोसे वाटणे

वाक्प्रचार संग्रह

 1. वाटाण्याच्या अक्षता लावणे स्पष्टपणे नाकारणे 
 2. वाण पडणे फूट पडणे कमी पडणे 
 3. वेड पांघरून पेडगावला जाणे एखादी गोष्ट समजून न समजल्याचे ढोंग करणे
 4. सतीचे वाण घेणे अवघड काम अंगावर घेणे
 5. सिंहावलोकन करणे गतकाळाचा आढावा घेणे 
 6. साडेसाती लागणे अडचणींची मालिका सुरू होणे 
 7. सळो की पळो करून सोडणे अतिशय त्रास देणे
 8. सहीसलामत सुटणे काहीही दोष न येता सुरक्षितपणे निसटणे
 9. सोक्षमोक्ष करणे शेवट करणे 
 10. सोनेरी अक्षरांत नोंदणे अतिशय मौल्यवान शब्द वापरून नोंद करणे
 11. सुंठीवाचून खोकला जाणे उपायाशिवाय अडथळा नाहीसा होणे
 12. साखर पेरणे गोड बोलून मोह पाशात गुंतविणे 
 13. सुळावरची पोळी धोक्याचे काम 
 14. शालजोडीतून देणे सभ्य रीतीने पण चांगलेच जाणवेल अशा पद्धतीने शब्द प्रहार करणे
 15. शिकार साधने कार्यभाग साधणे 
 16. शब्द झेलणे आज्ञा होताच त्याचे पालन करणे 
 17. शिखरास हात पोहोचणे मनोरथ सफल होणे गगनाला हात पोहोचणे
 18. शाहनिशा करणे एखाद्या गोष्टीची चौकशी करून खात्री करून घेणे
 19. शिष्टाई करणे मध्यस्थी करणे 
 20. शोभा होणे फजिती होणे 

वाक्प्रचार

 1. शंभर वर्षे भरणे नाश होण्याची वेळ जवळ येणे
 2. शास्त्रार्थ करणे किमान आवश्यक कृती करणे 
 3. हृदय नाचू लागणे खूप आनंद होणे
 4. हातचा मळ सहज शक्य असणारी गोष्ट 
 5. हाकारा येणे मरण जवळ येणे 
 6. हरभऱ्याच्या झाडावर चढविणे खूप स्तुती करून मोठेपणा देणे 
 7. हनुमान झेप घेणे मोठी उडी मारणे
 8. हद्दीबाहेर जाणे मर्यादा सोडणे 
 9. हाय खाणे धास्ती घेणे 
 10. हात ओला होणे फायदा होणे 
 11. हातपाय गाळणे नाउमेद होणे 
 12. हातावर शीर घेणे प्राणांची पर्वा न करणे
 13. हात आखडता घेणे देण्याचे प्रमाण कमी करणे 
 14. हातघाईवर येणे उतावीळ होणे 
 15. हात धुऊन पाठी मागे लागणे पिच्छा पुरविणे 
 16. हाडाची काडे करणे खूप कष्ट करणे 
 17. हिरमुसले होणे नाराज होणे

Leave a Reply