You are currently viewing शिवराज्याभिषेक – एक स्वर्गीय सोहळा

शिवराज्याभिषेक – एक स्वर्गीय सोहळा

महाराष्ट्रातला प्रत्येकजण मला मावळाच वाटतो. या मातीत जन्म घेणे म्हणजे गौरवच. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला शिवराज्याभिषेक सोहळ्याची संपूर्ण माहिती, जाणून घेण्याचा हा योग आला आहे. हे एक भाग्यच आहे. कारण शिवराज्याभिषेक सोहळा हा कोणत्याही स्वर्गीय सोहळ्याच्याच तोडीचा होता.

दहा दिवस आधी पासूनच हा सोहळा साजरा होत होता. ६ जूनच्या आधीचे काही महत्वाचे दिवस आपण जाणून घेऊया.

शिवराज्याभिषेक सोहळ्याची संपूर्ण माहिती

शिवराज्याभिषेक सोहळ्याची संपूर्ण माहिती

मे महिन्यात महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवर्शन केले. देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले.

? २९ मे इ.स.१६७४

“महाराज्यांची मुंज या दिवशी झाली”. उपनयन संस्कारामुळे राजे आता “द्विज” झाले होते. “उत्तरेस क्षत्रियांचे व्रतबंध होतात त्याप्रमाणे राजियाचा क्षेत्री व्रतबंध केला. महाराजांना शुद्ध क्षत्रिय केला गेला. त्याच दिवशी दुपारी तुलादान व तुलापुरुषदान विधी करून. महाराजांनी उशीरा मुंज झाल्याबद्दल. व आजवर कळत-नकळत घडलेल्या हत्यांबद्दल प्रायश्चित्त घेतले.

? ३० मे इ.स.१६७४

या दिवशी शिवराज्ञी सोयराबाईसाहेब, यांच्याशी व इतर तीन पत्नींसोबत समंत्रक विवाह लावण्यात आला. आणि सोयराबाई राणीसाहेब यांना ज्येष्ठ महाराणीसाहेब हा किताब मिळाला.

शिवराज्याभिषेक सोहळ्याची संपूर्ण माहिती

? ३१ मे इ.स.१६७४

या दिवशी छत्रपती शिवरायांची अग्निप्रतिष्ठा करण्यात आली. यात इंद्रायणी पूजा झाली व अनुपान्गिक सर्व विधी झाले. त्यावेळी आचार्य आणि ऋत्विक यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली.

? १ जून इ.स. १६७४

किल्ले रायगडाला राज्याभिषेकाचे वेध लागले होते.
रायगड पाहुण्या रावळ्यांनी भरून गेला होता. आजच्या दिवशी, ग्रह-यज्ञ, नक्षत्रहोम, दानधर्म व शेवटी ब्राम्हण भोजन हे कार्यक्रम पार पाडले.

? २ जून ते ४ जून १६७४

रायगडावर मोठ्या उत्साहाची धामधूम सुरू होती. कानाकोपऱ्यातून माणसे येत होती. जवळपास लाखभर लोक या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांचे मिष्ठान्नाचे जेवण होत असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. रायगड नजर लागावी इतका देखणा दिसत होता.

? ५ जून व ६ जून १६७४

राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. शिवरायांनी सर्वप्रथम आपल्या मातोश्री जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.

५ जून १६७४ च्या रात्रीपासूनच राज्याभिषेकाच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली.

राज्याभिषेक सोहळ्याचा समारंभ :- श शिवराज्याभिषेक सोहळ्याची संपूर्ण माहिती

शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा सप्तजलांनी अभिषेक करणे. आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते.

शिवराज्याभिषेक सोहळ्याची संपूर्ण माहिती

दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले. शेजारी सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते.

सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे. (१४ लाख रुपये मूल्य असलेले.) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजांना आशीर्वाद दिला.

राज्याभिषेकाचा उत्तर समारंभ :-

शिवराज्याभिषेक सोहळ्याची संपूर्ण माहिती

’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला.

राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे, शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले.

समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर उधळले. दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती

Leave a Reply