काळ व काळाचे प्रकार
क्रियापदावरून क्रियेचा बोध होत असताना ती क्रिया केव्हा घडते हे कळणेही महत्त्वाचे असते. ती क्रिया केव्हा घडते, हे पहाणे म्हणजेच क्रियापदाचा काळ ठरवणे होय. सर्वसाधारणपणे काळाचे वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ असे तीन प्रकार पडतात. क्रियापदाचे काळ वर्तमान काळ जी क्रिया वर्तमानात घडत असते किंवा जी घटना चालू काळात घडत असते त्या क्रियेच्या काळाला वर्तमान काळ असे…